इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

स्वराज्याचा पुनर्विचार या विषयावर सिंबायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्टस् तर्फे चर्चासत्राचे आयोजन.

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पूणे) –  १४/१/२०२०: सिंबायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्टस् आणि एस. पी. कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ व १८ जानेवारी २०२० रोजी “स्वराज्याचा पुनर्विचार” (Rethinking Swaraj) या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

सरत्या वर्षांमध्ये (सन २०१९) महात्मा गांधी यांची १५० वी जयंती तसेच आचार्य जावडेकर आणि आचार्य विनोबा भावे यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. या व्यतिरिक्त सन २०२० मध्ये लोकमान्य टिळक यांची १०० वी पुण्यतिथी आहे.

सदर परिसंवादाचा मुख्य उद्देश हा आपल्या अनन्यसाधारण इतिहासाला पुनरुज्जीवन देणे हा असून “स्वराज” च्या माध्यमातून ही संकल्पना तरुणांना भेट देण्याचा देखील आहे.

ज्या थोर महापुरुषांमुळे आज आपल्याला स्वराज्य अनुभवता येते आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी सदर परिसंवादास आपण उपस्थित राहावे अशी आपणास विनंती.

कार्यक्रमाची वेळ पुढील प्रमाणे :

दिनांक १७ जानेवारी : सकाळी ९ ते सायंकाळी ६.

दिनांक १८ जानेवारी : सकाळी ९ ते सायंकाळी ४.

स्थळ: मल्टीपर्पज / बहुउद्देशीय हॉल, सिंबायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्टस्, विमान नगर, नवीन कॅम्पस.

सदर कार्यक्रम हा सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: