इतरचंद्रपूरराज्यविदर्भसंपादकीय

वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या दिनदर्शिका घडीपुस्तिकेचे प्रकाशन

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(चंद्रपूर) – चिमूर तालुक्यात शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणने प्रसिद्ध केलेल्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेच्या घडीपुस्तिकेचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ॲड.भूपेश पाटील होते.प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठाणचे सल्लागार धनराज गेडाम,हरी मेश्राम,नरेश पिल्लेवान,रावन शेरकुरे उपस्थित होते.

दिनदर्शिकेच्या प्रकाशनप्रसंगी ॲड.भूपेश पाटील यांनी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून चिमूर परिसरात करित असलेल्या विविध उपक्रमांतून करित असलेल्या कार्याची माहिती दिली.दिनदर्शिका ही प्रत्येकांना आवश्यक असल्याने यावर्षी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून दिनदर्शिकेचे वितरण संपूर्ण चिमूर तालुक्यात करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे ॲड.पाटील यांनी सांगितले.धनराज गेडाम,हरी मेश्राम यांनीही आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.

संचालन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणचे सचिव सुरेश डांगे यांनी केले.आभारप्रदर्शन कैलाश बोरकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनोज राऊत,आकाश भगत,विनोद गेडाम,सुधीर रामटेके,गणेश मेश्राम,विजय खोब्रागडे,वैभव मेश्राम,प्रदीप मेश्राम,सदानंद रामटेके,किसन कुमले,किशोर श्रीरामे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: