इतरपश्चिम महाराष्ट्रराज्यसंपादकीयसोलापूर

दत्ताञय भोसले यांना धानुका इनोव्हेटिव्ह अग्रीकल्चर पुरस्कार प्रदान

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पंढरपूर) –  डाळिंब ,द्राक्ष यासारख्या फळबागांमध्ये करत असलेल्या नाविन्यपूर्ण कार्याबद्दल शुक्रवारी नवी दिल्ली येथे दत्तात्रय साहेबराव भोसले यांना “धानुका इनोव्हेटिव्ह अग्रीकल्चर अवार्ड” ने सन्मानित करण्यात आले.

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सी.सुब्रह्मण्यम नॅशनल अग्रीकल्चर सायन्स कॉम्प्लेक्स( NASC) नवी दिल्ली येथे भारत सरकारचे कृषी राज्यमंत्री मा.ना.कैलाश चौधरी यांचे शुभहस्ते व भारत सरकारचे जलशक्ती मंत्री जी.एस.शेखावत , उत्तरप्रदेशचे माजी कृषीमंत्री व विद्यमान खासदार अशोक वाजपेयी, पद्मविभूषण प्रोफेसर आर.बी.सिंह,भारत सरकारचे कृषी आयुक्त डॉ.एस.के.मल्होत्रा,आयसीएआरचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ एच.पी.सिंग,धानुका अग्रीटेक लिमिटेडचे चेअरमन आर.जी.अगरवाल,मॅनेजिंग डायरेक्टर एम.के.धानुका यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला .

या शानदार सोहळ्यासाठी आयसीएआर व आयएआर,नवी दिल्ली येथील प्रमूख शास्त्रज्ञ,युनिमॅक्सचे बी.टी. गोरे,वेगवेगळ्या श्रेणीतील पुरस्कार विजेते व देशभरातून हजारोंच्या संख्येने आलेले प्रगतशील शेतकरी बांधव,धानुका अग्रीटेक लिमिटेडच्या सर्व आऊटलेटस् चे पदाधिकारी उपस्थित होते.

दत्ताञय भोसले पंढरपूरच्या सरकोली गावचे असुन या अगोदर त्यांना 2016 चा राज्यस्तरीय डाळींबरत्न , 2017 मध्ये वसंतदादा कृषिभूषण ,2018 मध्ये भारत सरकार आरसीएफ प्रगतशील किसान , 2019 मध्ये सकाळ एक्सलन्स अवार्ड इन अग्रीकल्चर सेक्टर पुरस्कार मिळाले आहेत. ते प्रयोगशील शेतकरी असुन फळबागाविषयी विविध शेतकऱ्यांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. या पुरस्कारामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: