इतरपश्चिम महाराष्ट्रराज्यसंपादकीयसोलापूर

युवा भीम सेनेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मूक बधिर मूलाना मिष्टान्न भोजनाचे वाटप

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(सोलापूर) – येथील युवा भीम सेनेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मूकबधिर निवासी शाळा मोहोळ येथील मूकबधिर मुलांना युवा भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश (अण्णा) डोलारे यांच्या हस्ते मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.हा आगळा वेगळा कार्यक्रम ,एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी संबंधित शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजकुमार पाटील,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदर्शन साठे,शाळेचे संस्थापक राजकुमार पाटील म्हणाले की असे उपक्रम राबवून मूकबधिर मुलांना देखील एक मायेचा हात देण्याचे गरजेचे आहे असे सांगितले व सदर कार्यक्रमाचे इतरहू संघटनांने याचा बोध घ्यावा असे आव्हान केले.

यावेळी सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खंडू बनसोडे, अनिल बनसोडे, युवराज सकट, संजय तांबे,सुनिल काळे,प्रकाश गायकवाड,युवराज रणदिवे, विकास डोलारे,राजाभाऊ आष्टाळ,भैय्या बनसोडे,विक्की कांबळे,आनंद जाधव,दादाराव बनसोडे,नवल बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: