इतरगुन्हेविश्वराज्यवर्धाविदर्भ

शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड येथे मध्यरात्री २३ हजार रुपये किंमतीचा माल लंपास

Spread the love

दशरथ ढोकपांडे,(महाराष्ट्र विश्व न्यूज,हिंगणघाट -वर्धा) – शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड येथे मध्यरात्री एका अज्ञात चोरटयाने सोन्याचे झुमके व पाच हजार रुपये नगदी असा एकूण २३ हजार रुपये किंमतीचा माल लंपास केल्याची घटना बुधवार रोजी घडली.

संत ज्ञानेश्वर वार्ड येथील भाइमारे ले-आउट येथील रहिवासी संजय वसंतराव महाबुधे यांचेकडे हा चोरिचा प्रकार घडला.संजय महाबुधे हे आपल्या कुटुंबियांसह रात्री घरी झोपेत असतांना हा प्रकार घडला.रात्री १ वाजताचे दरम्यान ते लघुशंका करण्यासाठी उठले असता नजरचूकिने त्यांचे घराचे दार बंद करण्यास विसरले.

सकाळी सात वाजता झोपुन उठताच त्यांना कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले, त्यांनी कपाटाची पाहणी केली असता चोरटयाने पांच ग्राम सोन्याचे १८ हजार किमतीचे कानातील झुमके तसेच पांच हजार रोख स्वरूपातील मुद्देमाल लुटल्याचे लक्षात आले.

शहर पोलिसांनी अपराध क्र.६/२० नुसार भादवी३८० अंतर्गत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास ए एस आय रवी वानखेड़े आपल्या सहकाऱ्यांसह करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: