इतरचंद्रपूरराज्यविदर्भसंपादकीय

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत ग्राहकांना त्रास काँग्रेस पक्षाचे निवेदन

Spread the love

निखिल खानोरकर,(महाराष्ट्र विश्व न्यूज,शंकरपुर) –  येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये काम्पुटर कनेक्टिव्हिटी नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने ही कनेक्टिव्हिटी तात्काळ दुरुस्त करण्यात यावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातुन दिला आहे.

*याबाबत सविस्तर वृत्त असे की शंकरपूर येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा असून इथे पाच कर्मचारी कार्यरत आहे या बँकेत शंकरपूर व परिसरातील 28 गावातील ग्राहक असून हे ग्राहक संख्या जवळपास दहा हजाराच्या वर आहे परंतु मागील तीन महिन्यापासून या बँकेतील कम्प्युटर कनेक्टिव्हिटी खराब असल्याने एका काम्पुटर कनेक्टिव्हिटी वरच बँक कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.

त्यामुळे ग्राहकांना पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी तीन ते चार तास रांगेत उभे राहावे लागत आहे याशिवाय या बँकेत संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना शासनाच्या विविध योजनांचा असलेले ग्राहकांचे खाते आहे. हे ग्राहक सत्तर वर्षाच्या गटातील असल्याने त्या ग्राहकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तीन महिन्यापासून कनेक्टिव्हिटी नसल्याने ग्राहकांना पासबुक वर एन्ट्री करून मिळत नाही नवीन खाते काढून मिळत नाही ज्यांचे खाते निघाले त्यांना पासबुक मिळत नाही शंकरपूर येथील व्यापारी वर्गाचे ही खाते याच बँकेत आहे त्यामुळे त्यांनचेही आर टी जी स चे कामे होत नाही, याशिवाय येथील कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी त्रास होत आहे.

हे काम करण्यासाठी येथील एका कर्मचाऱ्याला रोज चिमूर ला जावे लागत असल्याने येथील कामाचा खोडम्बा होत असून एकाच कम्प्युटरवर कनेक्टिव्हिटी असल्याने चारी कर्मचारी आळीपाळीने ट्रांजेक्शन चे काम करीत आहे, त्यामुळे येथील कर्मचारी ही त्रासलेले आहे .

त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन येथील बँक व्यवहार सुरळीत करून घ्यावे अशी मागणी पंचायत समिती उपसभापती रोशन ढोक तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सविता चौधरी माजी जी प सदस्य गीता ननावरे बाजार समिती संचालक आमोद गौरकर विवेक रानडे आशिष चौधरी आदींनी निवेदनातुन केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: