इतरराज्यवर्धाविदर्भसंपादकीय

नागरिकत्व अधिकार कायद्याला DNA चा आधार असावा:- बहुजन क्रांती मोर्चा

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(हिंगणघाट-वर्धा) – क्रांती मोर्चा राष्ट्रव्यापी रॅली प्रदर्शन अंतर्गत जिल्हा व तालुकानिहाय प्रदर्शन घेऊन हिंगणघाट तहसीलदार यांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना निवेदनात मागण्या करण्यात आल्या.

नागरिकत्व संशोधन कायदा हा धर्माच्या आधारीत असून संविधानाच्या अनुच्छेद 14, 15, 21 चे पूर्णतः उल्लंघन करतो, तसेच धर्माच्या आधारावर राष्ट्रीय नागरीकता नोंदणी सुद्धा वैध ठरत नाही, यामुळे देशात अशांतीचे वातावरण निर्माण झाले आहे या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे.

नागरिकता संशोधन कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणी करता वेळेस डी एन ए चा आधार घेतल्या जावा कारण योग्य व्यक्तीला त्याची नागरिकता सिद्ध करता येईल. इ व्ही एम ला व्ही व्ही पॅट लावले असता ईव्हीएम मध्ये चार दोष आहे.

त्या दुरुस्तीसाठी शंभर टक्के व्ही व्ही पॅट लावण्यात यावे, 2021 ला होणारी जनगणना जाती आधारित जनगणना करावी त्याचा रेकॉर्ड हार्ड कॉपी मध्ये प्रकाशित करावा अशा विविध मागण्या बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले. यावेळी तालिब शेख, मलक वहाब, डॉ धोपटे, आरिफ कुरेशी,अनिल जवादे, इंजि निखिल कांबळे, ऍड. मलनस, गजानन माऊसकर, अनिल भोंगाडे, बबन जगताप,संदेश मुन, नदीम अली, मयूर पाटील, चंद्रहास्य कांबळे आदी व भिम आर्मी ,राष्ट्रीय किसान मोर्चा,संभाजी ब्रिगेड, टिपू सुलतान ब्रिगेड, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,एम आय एम,विदर्भ आघाडी,भारत मुक्ती मोर्चा, आदिवासी परिषद व अन्य पक्ष संघटनेचा समावेश होता.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: