इतरचंद्रपूरराज्यविदर्भसंपादकीय

राष्ट्रसंताच्या भजनांनी तपोभूमी दुमदुमली

भरगच्च कार्यक्रमाच्या आयोजनाने राष्ट्रसंताचा तपोभूमी परिसर झाला आध्यात्मिक आणि धार्मिक

Spread the love

निखिल खानोरकर,(महाराष्ट्र विश्व न्यूज,चंद्रपूर ) – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी गुंफा गोंदेडा येथे गुंफा यात्रे महोत्सवा सुरवात झाली असून मंगळवारी रात्री9 वाजता राज्यस्तरीय भजन स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेचे उदघाटन आमदार बंटीभाऊ भागडीया यांच्या उपस्थितीत पार पडले या भजन स्पर्धेमुळे संपूर्ण तपोभूमी परिसर राष्ट्रसंताच्या भजनांनी दुमदुमला.

मागील दोन दिवसांपासून तपोभूमी गुंफा यात्रेला सुरवात झाली असून अनेक कार्यक्रम होत आहेत या भजन स्पर्धेत 50 हुन अधिक भजन मंडळांनी सहभाग घेतला या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी आमदार भागडीया म्हणाले कि महाराजांच्या भाजनामध्ये खूप मोठी ताकद असून जीवन जगायला प्रेरणा देणारे आहे.

भाजनाने मानवा च्या जीवनात धार्मिक आणि आध्यात्मिक शक्तीची वाड होऊन जीवनमान उंचावते एवडी शक्ती महाराजांच्या भजनात आहे राष्ट्रसंताचे भजन आत्मसात केले तर दैवी शक्ती अनुभवास येऊन जीवन सुजलाम सुफलाम होईल.

या वेळी भाजपा उपाध्यक्ष डॉ श्यामजी हटवादे जुनेद खान सुनील कीटे विलास कोराम मंगेश धाडसे आणि गुंफा यात्रा समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी व भजन मंडळाचे सदस्य उपस्थित होते दि 8 ला सकाळी ग्रामसफाई श्रमदान करून रामधून काढण्यात येऊन मा नात्तुजी मडावी यांनी रामधून चे महत्व सांगितले यानंतर नेत्र रोगनिदान शिबीर चे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन सेवाग्राम मेडिकल कालेज सेवाग्राम आय हास्पिटल लायसन्स क्लब चंद्रपूर कस्तुरबा हास्पिटल सेवाग्राम वर्धा यांनी डॉ शुक्ला आणि टीम यांनी केले या शिबिरात 500 च्या वर रुग्णांनी भाग घेऊन डोळे तपासणी केले आणि 30 रुग्णांना मोतीबिंदू निघाल्यामुळे त्यांना स्वतःच्या गाडीने ऑपरेशन साठी सेवाग्राम ला नेण्यात आले .

यानंतर महिलांसाठी महिला मेळावा घेण्यात आला यात ममता ताई डुकरे जीप सदस्य सौ गीताताई करमेणगे सौ लताताई पिसे सभापती प स चिमूर उपस्थित होत्या यात सुमित्रा बाई चौखे रुजु ठाकरे राजनीताई घुगरे सविता पिसे शारदाताई शिरभये रत्नमाला सोनुने यांनी केले.

सूत्र संचालन नूतन गजभे कु योगिता गजभे यांनी केले यात भरगच्च महिलांची उपस्थिती होती यानंतर क्रीडा स्पर्धा ला सुरवात झाली यात कुबडी घेण्यात आली यात अनेक संघांनी भाग घेतला असून ही स्पर्धा सुरू झाली आहे .

या स्पर्धेचे उदघाटन देवाडे सर मुख्याध्यापक गुरुदेव विद्यालय गोंदेडा यांनी केले अश्या अनेक कार्यक्रमा च्या रेलचेलीत गुंफयात्रा महोत्सव तपोभूमीत सुरू असून या भरगच्च कार्यक्रमामुळे राष्ट्रसंताच्या तपोभूमीत आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरनाची निर्मिती झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: