इतरऔरंगाबादमराठवाडाराज्यसंपादकीय

जि.प्र.प्रशाला ढोरकीन येथे शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थाचे शैक्षणीक नुकसान

गणित विषयासह अन्य दोन विषय शिक्षकांची कमी

Spread the love

ऋषिकेश मुळे ,(महाराष्ट्र विश्व न्यूज,पैठण) – पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील जिल्हा परिषद प्रशाला मधील शाळा इयत्ता पाचवी ते दहावी पर्यतचे वर्ग आहे आणी या शाळेत शिक्षकांच्या तिन जागा रिक्त आहेत .

त्यापैकी आठवीं,नववी व दहावी या तिन वर्गासाठी गणित विषयांचे शिक्षक नसल्याने विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान थाबण्यासाठी शिक्षकांच्या तिन रीक्त जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण कमिटीने शिक्षणाधीकारी यांना निवेदनाद्वारे केली.

शाळेत पाचवी ते दहावी पर्यत एकूण 679 विद्यार्थी शिक्षण घेत आहे.त्यांना शिकवण्यासाठी एकुण 19 शिक्षकांची मान्यता आहे.यातुन तिन शिक्षकांची पदे रिक्त आहेत गेल्या सहा वर्षापासुन गणित विषयाला शाळेत शिक्षकच नाही.यासंर्दभात शिक्षण विभागाकडे अनेक वेळा मागणी केली होती पण आत्तापर्यत शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत.

या शाळेत ढोरकीन,कारकीन,बोरगांव ,ढोरकीन तांडा 1 , ढोरकीन तांडा 2 ,वाडी आती वस्तीवरुन विद्यार्थी शिकण्यासाठी येतात.मात्र शिक्षकांची अपुरी संख्या मुळे विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होता आहे.शिक्षण विभागाने या समस्येकडे गार्भीयाने लक्ष देऊन विद्यार्थाची होणारी शैक्षणीक नुकसान थांबवून विद्यार्थाला न्याय मिळवून द्यावा.

या संदर्भात शालेय शिक्षण समितीच्या बैठकीत सर्वानुमते शिंक्षकांच्या खाली रीक्त जागा भरण्याचा प्रस्ताव घेतला.प्रस्तावानुसार शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र मुळे माजी अध्यक्ष साईनाथ कासोळे आणी शालेय समितीचे सदस्य यांनी गणित विषयांचे व दुसरे दोन विषयांचे रिक्त पद तत्काळ भरण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परीषद शिक्षण अधीकारी यांना देऊन विद्यार्थाचे होत असलेले शैक्षणिक नुकसान थांबवावे.अशी मागणी केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: