इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

पुरंदर तालुक्यातील पिंपरी येथे साकारणार बहुउद्देशीय उद्यान

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) –  पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील पिंपरी येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक,ग्रामस्थ व युवकांसाठी सोळा लक्ष रुपये खर्च करून बहुउददेशीय उद्यान साकारण्यात येणार आहे,नुकतेच सरपंच मीनाताई शेंडकर यांच्या हस्ते वाॅल कंपाऊंड व बहुउद्देशीय उधाण कामाचे उद्घाटन करण्यात आले.

पिंपरी ग्रामपंचायत कार्यालया लगत उद्यान साकारण्यात येणार आहे. यामध्ये वाॅल कंपाऊंड भिंत बाधणे,स्टेज बांधने, बगीच्या अंतर्गत लोकांना चालण्यासाठी रस्त्यावर पेव्हींग ब्लाॅक बसविणे, गेट बसविणे,झाडे लावणे इत्यादी कामे या निधीमधुन होणार आहेत.

पुरंदर तालुक्यात काही ठराविक ग्रामपंचायतीने उद्यान विकसित केले आहेत आता त्या गावां मध्ये पिंपरी गावचा समावेश होणार आहे. सकाळी लोकांना मार्निग वाक करणे,व्यायाम करणे,निवांत गप्पा मारण्यासाठी हे व्यासपीठ योग्य ठरेल तसेच छोटे मोठे सार्वजनिक कार्येक्रम देखील या ठिकाणी होऊ शकतील असे हे बहुउद्देशीय ऊद्यान उभारणार आहे.

या ऊद्यानाच्या कामासाठी यापुर्वी ३ लाख रू निधी खर्च केला असुन आता ग्रामपंचायत ८ लाख रू निधी खर्च करत आहे,तर उर्वरीत कामासाठी खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या खासदार फंडातुन ५ लक्ष रू निधी मिळाला आहे असा एकुण १६ लक्ष रू निधी खर्च करून हे ऊद्यान होणार असल्याचे सरपंच मीनाताई शेंडकर यांनी सांगितले.

यावेळी कृषिभुषण महादेव शेंडकर,तंटामुक्ती अध्यक्ष संपत शेंडकर,पोलिस पाटील पुनम शेंडकर ग्रामपंचायत सदस्य सुषमा थेऊरकर,माजी चेअरमन पांडुरंग गायकवाड,सोसायटी संचालक अर्जुन मोघे,संतोष गायकवाड,प्रतिक शेंडकर,अंगणवाडी सेविका सिमा शेंडकर यांच्या सह ग्रामस्थं महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: