इतरचंद्रपूरराज्यविदर्भसंपादकीय

कामे होत नसल्याने ग्रा प. सदस्यांचे राजीनामे

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(शंकरपुर-चंद्रपूर) – येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथील ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील कामे होत नसल्याने सामूहिक राजीनामे दिलेले आहे.
ही गट ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत मध्ये लावारी व बोरगाव या गावाचा समावेश होतो.

या ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास नऊशे लोकसंख्या येत असून, सात सद्स्यीय ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून जोत्सना वासनिक कार्यरत आहे या सात सदस्यांपैकी कु सुखदेव व रुपाली राऊत या दोन सदस्यांनी वैयक्तिक कारणास्तव याआधीच राजीनामे दिले आहेत उर्वरित सरपंच वगळता इतर चार ग्रामपंचायत सदस्य राजू दडमल, हरिदास सुखदेवे, जीवन रंदई व प्रेमदास राऊत यांनी एकतीस डिसेंबरला सरपंच यांच्याकडे राजीनामे दिलेले आहेत.

आपल्या राजीनाम्याचे कारण देताना त्यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटल आहे की गावात पाण्याची खूप टंचाई आहे, गावातील असलेले बोरवेल बंद पडल्या आहेत 1 वर्षापूर्वी एका बोरवेल वर पाण्याची टाकी लावण्यात आली तीसुद्धा बंद पडली आहे, तसेच बबन मुन यांच्या घराजवळ दुसरी पाण्याची टाकी लावण्यात आली आहे ते सुद्धा बंद पडलेली आहे, लोकांना घरकुल मंजूर करत असताना सरपंच आपल्या पार्टीच्या लोकांचे घरकुल मंजूर करतात व त्या घरकुल मंजुरीसाठी पैसे मागत असल्याचा आरोप त्यांनी प्रसिध्दी पत्रकात केलेला आहे.

या ग्रामपंचायत अंतर्गत लावारी हे गाव येतें या गावातील मामा तलाव चा लिलाव ग्रामपंचायत मार्फत केल्या जातो त्याचे पैसे सुद्धा ग्रामपंचायतीलाच मिळते परंतु तेथील जिल्हा परिषद शाळेत साधा मुरूम सुद्धा टाकला जात नाही, गावात धुमधडाक्यात थोर पुरुषांची, महाराजांची पुण्यतिथी जयंती साजरी केल्या जाते परंतु ग्रामपंचायत मार्फत गावात स्वच्छता ठेवल्या जात नाही.

शासनाचा आदेश असतानासुद्धा घरोघरी शौचालय बांधण्यास ग्रामपंचायत सहकार्य करत नाही गावातील विकासाच्या बाबतीत ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतल्या जाते परंतु त्याची अंमलबजावणी केल्या जात नाही वारंवार लेखी व तोंडी सूचना सरपंचांना दिल्या जाते परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने राजीनामा देत असल्याचे प्रसिद्धी पत्रात त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे या गावचे आता सरपंच एकमेव सदस्य आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: