इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

३ जानेवारी रोजी महिला मुक्ती परिषद

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताद्वी महोत्सव समिती व झाशीची राणी प्रतिष्ठान ट्रस्ट तर्फे स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी रोजी महिला मुक्ती परिषद आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचा सम्यक गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड येथे शुक्रवार, दि. ३ जानेवारी २०२०,सायं. ५ वा जता हा कार्यक्रम होणार आहे.सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताद्वी महोत्सव समिती तर्फे संयोजक नागेश भारत भोसले यांनी ही माहिती दिली.

अॅड. शारदा वाडेकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.अंकल (यादवराव) सोनवणे ,वसंतराव साळवे, यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

माजी नगरसेविका, झाशीची राणी प्रतिष्ठान ट्रस्टच्या संस्थापक अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून रमेश राक्षे ,जांबुवंत मनोहर, मिलिंद अहिरे,अॅड. किरण कदम , दिलीपसिंग विश्वकर्मा ,सचिव बगाडे उपस्थित राहणार आहेत.

सम्यक पुरस्कार गौरव सोहळा

सामाजिक क्षेत्रातील सुनीती सु.र.,लता राजगुरु ,अॅड.नीलिमा वर्तक,सुमन मोरे, सुमन गायकवाड , कावेरी जाधव, नीता अडसुळे,मोहिनी कारंडे, मनिषा जाधव,रुक्साना शेख, रेखा चौरे यांना सम्यक गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात आनंद वैराट, दिपक (आण्णा) गायकवाड ,संतोष (आबा) सुरते,मनिषा कावेडीया ,अमोल(सोनू) काशिद,पुरुषोत्तम नांगरे,सचिन साठे ,भागवत कांबळे,सचिन भालशंकर यांचा समावेश आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: