इतरचंद्रपूरराज्यविदर्भसंपादकीय

महाराष्ट्र पोलिस बाँईज असोसिएशनच्या चिमुर तालुका अध्यक्ष पदी शुभम पारखी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(चिमुर-चंद्रपूर) –  महाराष्ट्र पोलीस आणि पोलीस कुटुंबियाच्या कल्याणासाठी सदैव अग्रेसर असणाऱ्या तसेच सामाजिक क्षेत्रात आपला आपला वेगळाच ठसा उमटवलेल्या महाराष्ट्र पोलीस बाँईज असोसिएशन या संघटनेच्या चिमुर तालुका अध्यक्ष पदी शुभम पारखी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस भरतीत पोलिसाच्या मुलांना 5 टक्के आरक्षण मिळवून देणारी ही असोसिएशन आहे राज्यातील पहिलीच पोलिस कुटुंबासाठी काम करणारी असोसिएशन आहे. पोलिसांच्या कल्याणासोबतच संघटनेने संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य यांच्याशी चर्चा करून विदर्भ अध्यक्ष श्याम चव्हाण आणि उपाध्यक्ष अजय ठाकूर व चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष उपक्षम रामटेके यांनी चिमुर तालुका अध्यक्ष पदी शुभम पारखी यांची निवड केली आहे.

जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात सदैव तत्पर आणि पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळाच ठसा असलेले शुभम पारखी यांच्या नियुक्तीने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, आपण सदैव पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियाच्या कल्याणासाठी कार्य करू असे यावेळी नवनियुक्त तालुका अध्यक्ष शुभम पारखी यांनी सांगितले.

त्यांच्या नियुक्ती साठी संघटनेचे अमरावती विभागीय अध्यक्ष विनोद तायडे, अकोला जिल्हा अध्यक्ष निलेश किरतकाट, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष उपक्षम रामटेके तसेच अनेकांनी त्यांचे कौतुक करून त्यांना भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: