इतरराज्यवर्धाविदर्भसंपादकीय

“मानवाधिकार आणि महिला” या विषयावर चर्चासत्र

महिलांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल व्हायला पाहिजे-डॉ. गणेश बहादे

Spread the love

दशरथ ढोकपांडे ,(महाराष्ट्र विश्व न्यूज,हिंगणघाट वर्धा) – स्थानिक श्री.साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने “मानवाधिकार आणि महिला” या विषयावर मार्गदर्शनचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उत्तम पारेकर,मार्गदर्शक डॉ. गणेश बहादे,संयोजक प्रा. विनोद मुडे,प्रा.आरती देशमुख,प्रा. संजय दिवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

महिलांच्या हक्कांविषयी आंतरराष्ट्रीय करारांत मान्यता मिळूनही, स्त्रिया निर्धन आणि निरक्षर राहण्याचे प्रमाण मोठे आहे. वैद्यकीय सुविधा, मालमत्तेची मालकी, पतपुरवठा, प्रशिक्षण आणि रोजगारात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी संधी मिळते. त्या पुरुषांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या सक्रीय असण्याची शक्यता फारच कमी आहे आणि त्या घरगुती हिंसाचाराचा बळी होण्याची शक्यता खूपच मोठी आहे.

ग्रामीण भागात स्त्रिया अजूनही स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत.इथे त्या पुरुषांच्या निर्णयावर अवलंबून राहतात.त्यांची निर्णय क्षमता वाढणे गरजेचे आहे.घटनेने अनेक अधिकार दिलेले आहेत,याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे .समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोनात बदल व्हायला पाहिजे. असे विचार चर्चसत्रात मार्गदर्शक प्रा.डॉ. गणेश बहादे यांनी मांडले.

यावेळी प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर,प्रा.आरती देशमुख,प्रा.संजय दिवेकर,विद्यार्थी कु.सीता कोल्हे,कु.पिंकी बारापात्रे शुभम साळवे,शेखर चाहारे,चंद्रकांत पिपराडे, प्रीतम डफ,यांनीही चर्चासत्रात सहभागी होऊन विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विनोद मुडे, सूत्रसंचालन कु.प्राची चाफले, तर आभार प्रदर्शन राजकुमार कोरेवार यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: