इतरगडचिरोलीराज्यविदर्भसंपादकीय

युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी अविनाश भोसलेची निवड

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(आष्टी -गडचिरोली) – जनपरिवर्तन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन करुन समाज हितासाठी सतत झटणाऱ्या आष्टी ( ता मोहोळ ) येथील अविनाश भोसले यांची सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस ( आय ) च्या सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली .

देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे, जिल्हा नेते भैरवनाथ भोसले, सुदर्शन आवताडे, किशोर पवार संजय जाधव आदी युवक नेते उपस्थित होते.

मला मिळालेल पद ही माझ्यासाठी एक समाजसेवेची संधी असून याचा उपयोग जिल्ह्यातील शेतकरी , युवक, महिला यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व काँग्रेसची ध्येय धोरणे सर्व समाजघटकांपर्यत पोहचवण्यासाठी करणार असल्याचंं मत भोसले यांनी व्यक्त केलं .

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: