इतरऔरंगाबादमराठवाडासंपादकीय

फ्रेंड सर्कल ग्रुपतर्फे ‘गरीबांची सेवा हीच समाजसेवा’ चा नारा

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(औरंगाबाद) – औरंगाबादमधील बालाजी नगर येथील फ्रेंड सर्कलकडून फुटपाथवर राहणाऱ्या बेघरांना 25 हुन अधिक ब्लॅंकेट तसेच उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. पावसाने विश्रांती घेतली व गुलाबी थंडीची चाहूल सुरू होताच राज्यात हुडहुडी भरली. याच हुडहुडीपासून बेघर असलेल्या लोकांचा बचाव करण्यासाठी काही युवकांनी हा उपक्रम राबवला.

यावेळी त्यांना खाण्यासाठी चिवडा व बिस्कीट पुड्यांचे वाटप देखील करण्यात आले. या ग्रुपकडून करण्यात आलेली मदत म्हणजे माणुसकीच उत्तम उदाहरण असल्याची चर्चा परिसरात होती. सर्वच स्तरातून या युवकांचे कौतुक करण्यात येत होते.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी फ्रेंड सर्कल ग्रुप चे गोपाल भुतडा, गोविंद तोष्णीवाल, मोहित रूनवाल, शुभम सेठी आणि गोविंद अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: