इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्यसंपादकीयसामाजिक संस्था

मदरसामधील विद्यार्थ्यांसाठी अन्नधान्य ,जीवनोपयोगी साहित्याची मदत

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी ‘ तर्फे दौंडमधील ‘इम्दादुल उलुम युसुफिया ‘ या मदरसामधील विद्यार्थ्यांसाठी अन्नधान्य आणि जीवनोपयोगी साहित्याची मदत देण्यात आली. हा कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी झाला.

स्थानिक नगरसेवक सोहेल खान,मौलाना रशीद, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम,सहसचिव इरफान शेख,प्राचार्य डॉ. किरण भिसे उपस्थित होते.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी २५० विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: