नागपूररणधुमाळीराज्यविदर्भ

मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रिपदाची लॉटरी कुणाकुणाला लागणार ?

२३ किंवा २४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता..

Spread the love

निखिल खानोरकर,.(महाराष्ट्र विश्व न्यूज,नागपुर) – महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत या सहा मंत्र्यांना खाती वाटून देण्यात आली आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. ठाकरे सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर आता पुढे मंत्रिपदाची लॉटरी कुणाकुणाला लागणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रि पदासह १५ खाती आहेत तर राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रिपद घेत आहे. त्यामुळे तुलनेत कमी महत्त्वाची अशी १६ खाती तर काँग्रेसकडे १२ खाती आहेत.

आगामी मंत्री मंडळ विस्तारत शिवसेनेतून अनिल परब, सुनील प्रभू. दिवाकर रावते, दीपक केसरकर, भास्कर जाधव किंवा उदय सामंत, संजय शिरसाठ, आशिष जयस्वाल आणि शंभूराजे देसाई यांचं मंत्रिपदासाठी दावेदारी पक्की समजली जात आहे.

तर राष्ट्रवादीतून अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख किंवा राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड किंवा धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील आणि दत्ता भरणे यांची नावं ठरली आहेत.

काँग्रेसकडून अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण, विजय व़ड्डेट्टीवार, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, सुनील केदार, अमिन पटेल, के. सी. पडवी, विश्वजित कदम, अमित देशमुख आणि सतेज पाटील यांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेधन आटोपल्यावर २३ किंवा २४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: