परभणीमराठवाडा

शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा म्हणून रेशीम व्यवसाय करावा-आमदार राजू नवघरे 

Spread the love
पूर्णा, प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुतीची लागवड करून रेशीम शेतीकडे राज्यातील शेतकरी वळला आहे एकूण उत्पादनाच्या 70 टक्के उत्पादन हे व त्यासोबत शेतीही संपूर्ण मराठवाड्यामध्ये तुती लागवडीच्या माध्यमातून केली जाते परंतु अजूनही मुबलक पाणी असूनही पूर्णा गोदावरी नदीच्या काठचे शेतकरी रेशीम शेतीकडे वळले नाहीत त्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वय साधून प्रत्येक शेतकऱ्यांनी गावात काम मिळावे यासाठी तुतीची लागवड करून शेती केल्यास तो शेतीला पर्यायी जोडधंदा म्हणून उभा राहिला पाहिजे व मजुरांचे होणारे स्थलांतर थांबले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले दिनांक 12 डिसेंबर रोजी पूर्णा पांगरा रोड वरील समर्थ बाजार मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रेशीम कोष खुल्या बाजारपेठेचा व रीलींग धागा केंद्राचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते या कार्यक्रमाला वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू नवघरे  उपसंचालक अर्जुन बोरे उपसंचालक दिलीप हाके जिल्हा रेशीम अधिकारी जीआर कदम या केंद्राचे मुख्य चेअरमन डॉक्टर संजय लोळगे भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष संभाजी मोहिते किसनराव पारवे पूर्ण कारखान्याचे माजी संचालक रुस्तुम राव वजे गंगाधरराव धवन शिवाजी सवराते चांदोजी बोबडे अकील अहमद बाबा पठाण होईल कुरेशी संचालक दादाराव चापके प्रल्हाद चापके संचालक बालाजी वैद्य आदींची उपस्थिती होती यावेळी सर्वप्रथम समर्थ चे अध्यक्ष डॉक्टर संजय लोलगे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून या खुल्या बाजारपेठेमध्ये परभणी जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा व दोनशे ते तीनशे किलोमीटर ते हजार किलोमीटर अंतरापर्यंत रेशीम कोष विकण्यासाठी यापुढे जाण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले याच बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर यावेळी बोलताना वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी सांगितले की वसमत परिसरामध्ये साखर कारखानदारी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वामुळे सक्षम बनली आहे परंतु शेतीसोबत जोडधंदा करण्यासाठी रेशीम व्यवसाय चांगला असल्याचे ते म्हणाले केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना रेशीम उद्योगास मिळाव्यात यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठविणार असल्याचे ती म्हणाली तर यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले की पारंपारिक पद्धतीने शेती करत असताना आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे बाजारामध्ये चढ्या भावाने विक्री होत असलेल्या वस्तूंचे उत्पादन शेतकऱ्यांनी केले पाहिजे एकीकडे पैठणी साडी साठी मोठी किंमत मोजावी लागत आहे तर तुती लागवडीतून कॉस्ट निर्माण केल्यास प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाला गावातच रोजगाराच्या संधी निर्माण होतात तर महाराष्ट्र सरकारच्या मनरेगाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला या व्यवसायातून सतत तीन वर्षे रोजगार मिळत आहेत परंतु आजच्या तरुण युवक पिढी या धंद्याकडे वळले पाहिजे यासाठी गावागावांमध्ये जनजागृती होणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल धामणगाव यांनी केले कार्यक्रमाला पूर्णा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: