इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसाहित्य

मंगळवार पेठेत दत्त जयंती उत्साहात साजरी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत असलेले श्री गुरुदेव दत्त यांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंगळवार पेठीतल अनेक नागरिकांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली होती.

दिगंबरा! दिगंबरा!! श्रीपाद वल्लभ दिगंबरा | नावाच्या जयघोषात श्री गुरुदेव दत्त जन्म सोहळा मोठ्या दिमाखात मध्ये संपन्न झाला. श्री दत्त जन्मकाळ संपन्न झाला . यावेळी मंदीर परीसरामध्ये भाविकांची उलोट गर्दी होती. दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदीर परीसर फुलांनी बहरून गेला होता दिवसभरामध्ये भाविकांची संख्या मोठी होती .

यावेळी दत्त जन्म कथा, पाळणा, भाविकांसाठी भोजन समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पद्मकृष्णा फाउंडेशनच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.सदानंद कृष्णा शेट्टी (मा.स्थायी समिती अध्यक्ष पुणे मनपा) व कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच पद्म कृष्ण फाऊंडेशनचे समस्त पदाधिकारी ट्रस्टी, पुरुषोत्तम शेट्टी, सदाशिव शेट्टी, प्रेमाताई शेट्टी, देवकी ताई शेट्टी, साक्षात सदानंद शेट्टी, माई जगताप, सुधीर इंगळे तसेच सदानंद शेट्टी मित्रपरिवार अश्विनी मित्रमंडळाचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: