पश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

नक्षत्र बनले महाराष्ट्रातील सहावारी रेडिमेड देणारा पहीला ब्रांड

मी भारतीय संस्कृतीचा चहेता आहे- गणेश तुम्मा, नक्षत्र संचालक

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – आजच्या युगातिल नवीन पिढीचा झुकाव पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त प्रमाणात होत असून युवापिढीचा पेहनावा पूर्णतः पाश्चात्य झाला आहे. या युवावर्गाला भारतीय संस्कृतीचा व संस्कृतीच्या वेषभूषेची ओळख व्हावी व वेशभूषाचा अनुभव यावा यासाठी नक्षत्र- सौंदर्य उजळविणारे वस्त्र आपले गेल्या आठ वर्षापासून योगदान देत आहे.

दर्जेदार नऊवारी साडी साठी जगप्रसिद्ध झालेले नक्षत्राने महिलांच्या गरजा व अपेक्षांची पुर्तता करण्यासाठी सहावारी रेडिमेड साडीच्या विक्रीमध्ये पुढाकार घेतला आहे. सदाशिव पेठ, कुमठेकर रस्त्या येथे नक्षत्रच्या सहावारी रेडिमेड साडी दालनाचे भव्य उदघाटन मोटिवेशनल स्पिकर विराली मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

तर प्रसंगी हास्य कलाकार संतोष चोरडीया, मा. महापौर कमलताई व्यवहारे, मनसे शहर अध्यक्षा रुपाली ठोबंरे,समाजसेवीका तृप्ती देसाई नक्षत्र परीवार, आणि मित्रवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्षत्र- सौंदर्य उजळविणारे वस्त्राची सुरुवात गणेश मधुकर तुम्मा व त्यांची पत्नी सौ.अनुराधा गणेश तुम्मा यांनी केली. आजतागत नक्षत्राच्या नावांनी पुणे(शनिपार), पुणे(बुधवार पेठ), कुमठेकर रास्ता, सांगवी, दत्तवाडी, शाखेच्या दै.दिप्यामान यशानंतर आता कुमठेकर रस्ता, पुणे येथील सहावारीचे मुख्य दालनस सुरुवात केली आहे.

या प्रसंगी बोलतांना नक्षत्राचे सर्वेसर्वा गणेश तुम्मा म्हणाले, नऊवारी साडी आमची ओळख आहेच परंतु ग्राहकांची पसंद आणि महिलांच्या दैनंदिन जीवनात वापरली जाणारी सहावारी साडीची गरज पाहता आम्ही रेडिमेड सहावारी बाजारपेठेत उपलब्ध करून दिली आहे. तुम्मा पुढे म्हणाले मी माझ्या भारतीय संस्कृतीचा चहेता आहे आणी मला माझी ही संस्कृती जोपासायला व पुढे न्यायला आवडेल.

विराली मोदी म्हणाल्या साड्यांमध्ये इतके प्रकारचे रेडिमेड प्रकार पाहून मला खूप आनंद होत आहे. माझ्या सारख्या अनेक लोकांना या दर्जेदार साड्या प्रत्यक्ष अनुभवता याव्यात या साठी नक्षत्रने बनवलेल्या विलचेअर ट्रॅक ची सराहना केली आणि आमच्या सारख्यांचा विचार केला म्हणून त्यांनी नक्षत्र व गणेश तुम्माचे आभार व्यक्त केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: