पश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

शरद पवार यांच्या वाढदिवस ‘ वॉक फॉर हेल्थ’ ने साजरा

खा. शरद पवार यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी डाँक्टर सेलच्या वतीने ' वॉक फॉर हेल्थ'

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढ दिवसानिमित्त दि.१२ डिसेंबर २०१९ रोजी ‘ वॉक फॉर हेल्थ’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल पुणे शहराध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांच्या मार्गदर्शानाखाली पुण्यात मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या आरोग्य प्रेमींचे हातात गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले गेले.

उद्याने, टेकडया, मैदाने अशा ठिकाणी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल चे पदाधीकारी, पक्षाचे नेते, कार्यकर्ते मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करीत होते.

प्रारंभ तळजाई टेकडी येथे सकाळी सहा वाजता झाला. साडेआठ वाजेपर्यंत नागरिकांची रक्त तपासणी, रक्तशर्करा तपासली गेली. आरोग्य जपण्याचा संदेश असले ली पत्रके वाटण्यात आली.

मोठे कार्यक्रम टाळून राज्यातील अवकाळी पावसाने खचलेल्या शेतकरी बांधवांना मदत केली जाणार आहे. या वेळी डाॅ सुनिल जगताप ,डाॅ हेमंत तुसे ,डाॅ सिद्धार्थ जाधव ,डाॅ सुनिल होनराव ,डाॅ राजेंद्र जगताप ,डाॅ गणेश निंबाळकर ,डाॅ विजय वारद ,डाॅ.विश्वंभर हुंडेकर ,डाॅ राहुल सूर्यवंशी ,डाॅ प्रताप ठुबे ,डाॅ ,शशिकांत कदम ,डाॅ सुजाता बरगाळे ,डाॅ सुलक्षणा जगताप , डॉ मंगेश खटावकर, डॉ राहुल सूर्यवंशी , डॉ उरसळ, डॉ धुमाळ, डॉ किणीकर,डॉ रवींद्र सुतार, डॉ राजश्री काकडे, डॉ वैशाली पथारकर, डॉ अनंत पाटिल, डॉ आसावरी पाटिल उपस्थित होते.

रेसकोर्सवर देखील हा उपक्रम आयोजित करण्यात आला. सिंहगड रस्ता येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: