इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

स्वसंरक्षणाकरिता नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन तरुणी झाल्या तयार…

वनराई आणि आयएसएमई तर्फे महिलांसाठी स्वसंरक्षणार्थ कार्यशाळेत घेतले धडे

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) –  प्रवासा दरम्यान बसमधील महिलांची छेड काढल्यास, सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत स्वत:चा बचाव कसा करावा याची प्रात्याक्षिके नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन तरुणींनी देण्यात आले.

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर होण्याबरोबरच ऐरणीवर आला असल्यामुळे महिलांनी स्वसंरक्षणासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वनराई आणि आयएसएमई (इंटरनॅशनल स्कूल फॉर मॅनेजमेंट एक्सेलन्स)तर्फे नोकरदार महिला आणि कॉलेज तरुणींसाठी खास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी यास्मिन कुरेशी यांनी महिलांनी स्व-सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच कार्यशाळेस उपस्थित सर्व महिलांना पेपर स्प्रे चे वाटप करण्यात आले.

यावेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, आयएसएमई चे संचालक सचिन खैरे, पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, निशा खैरे, चंद्रकांत इंगुळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत साबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित वाडेकर यांनी केले.

आयएसएमई चे संचालक सचिन खैरे म्हणाले, महिलांनी स्वत:च्या संरक्षणासाठी बॅग मध्ये पेपर स्प्रे, मिरची पावडर असे साहित्य सोबत ठेवावे. कामाच्या ठिकाणी अथवा महाविद्यालयाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक अत्याचारा(सेक्चुअल हॅरॅसमेंट)संबंधी महिलांनी वेळीच आवाज उठवला पाहिजे. तसेच घरातील पुरुषांनी महिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांचे मनोधैर्य वाढविले पाहिजे असल्याचे मत खैरे यांनी व्यक्त केले.

समाजातील महत्वाचा विषय म्हणून आज महिलांची सुरक्षा बनत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रबोधन करणे आजची गरज आहे. स्वतःची सुरक्षा करणे हे खूप महत्वाचे आहे.यासाठी अशा कार्यशाळा घेऊन तरुणींना मार्गदर्शन देणे महत्वाचे आहे असे रवींद्र धारिया यांनी सांगितले.

कार्यशाळेमध्ये यास्मिन कुरेशी यांनी स्व-संरक्षणासाठी कशा प्रकारे प्रतिकार केला जाऊ शकतो याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. स्व संरक्षणासाठी युवतींनी कार्यक्षम होऊन प्रतिकार रोखण्यासाठी कराटे, तांत्रिक बाबी या शिकणे गरजेचे आहे असे यास्मिन कुरेशी यांनी यावेळी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: