इतरप्रशासनबुलढाणाराज्यविदर्भ

महापोर्टल बंद करून एम पी एस सी मार्फत परीक्षा घ्या – आमदार बच्चु कडू यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Spread the love

गजानन कायंदे ,(महाराष्ट्र विश्व न्यूज,बुलडाणा) – महापोर्टल द्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसंदर्भात अनेक तक्रारी येत असून विद्यार्थ्यांनचे खूप नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे डोखेदुखी ठरणारे महापोर्टल तात्काळ बंद करून एम पी एस सी मार्फत सर्व परीक्षा घेण्यात याव्या अशे निवेदन आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले आहे.

तोंडावर आलेल्या परीक्षा अचानक स्तगीत केल्यामुळे विध्यार्थीचा भ्रमनिरास झाला आहे. विध्यार्थी अनेक दिवसापासून अभ्यास करत असतात परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे विध्यार्थी च्या मेहनती वर एक प्रकारे नागर चालवल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून येत आहे.

पूर्वी सारख्या परीक्षा सुरु करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वच स्तरावरून होत आहे. शासनाने लवकरात लवकर या विषयाकडे लक्ष घालून महाराष्ट्रतील अनेक तरुणांना न्याय द्यावा असे बच्चू कडू यांनी निवेदनात म्हंटले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: