इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

पत्रकार आकाश भोसले विशेष मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था व जिल्हा न्यायालय विधी सेवा न्याय प्राधिकरण यांच्या वतिने जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त संविधान जनजागृती करण्यात आली.

मानवाधिकार पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणुन बोलताना पुणे जिल्हा सत्र न्यायालय मा. न्यायाधिस व विधी सेवा प्राधिकरण सचिव पी.सी. भागवत म्हणाले की, आर्थिक दुर्लभ घटकातील एस.एस.टी व पिडीत महिलांच्या न्यायासाठी विधीसेवा प्राधिकरणा मार्फत मोफत विधितज्ञामार्फत न्याय बाजी मांढण्याकरीता विधितज्ञांची सेवा दिली जाते हे तळागाळातील लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.

जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त आज मानव अधिकार पुरस्कारांचे आयोजन करण्यात आलेे होते. मानवी हक्क संरक्षण जागृती च्या वतीने अध्यक्ष विकास कुचेकर यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, शुक्रवार पेठ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, पत्रकारिता या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. मनोहर जाधव (साहित्य), प्रा. फुलचंद चाटे (शैक्षणिक), संदीप बर्वे (सामजिक), सुनील जगताप (पत्रकारीता) यांना मानव अधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच, विशेष कार्य मानव अधिकार या पुरस्काराने आकाश भोसले (पत्रकारीता) यांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, संविधान ग्रंथ, शाल व श्रीफळ असे होते.

या कार्यक्रमामध्ये डॉ. सुधाकरराव जाधवर (अध्यक्ष, जाधवर ग्रुप) यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते. पी. सी. भागवत (सचिव, पुणे जिल्हा न्याय प्राधिकरण), सर्जेराव बाबर (सहा. पोलिस आयुक्त), अ‍ॅड. शार्दुल जाधवर (उपाध्यक्ष, जाधवर ग्रुप – सल्लागार मानवी हक्क संरक्षण व जागृती), अ‍ॅड. सचिन झालटे – पाटील (सल्लागार मानवी हक्क संरक्षण व जागृती), विजय बहाळकर (अध्यक्ष, टी डी एफ महाराष्ट्र राज्य) हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते तसेच, अंबरनाथ कांबळे (नगरसेवक, ह प्रभाग अध्यक्ष पिंपरी-चिंचवड), सचिन दुर्गाडे (अध्यक्ष, टी डी एफ, पुणे शहर), शरदचंद्र धारुरकर (अध्यक्ष, शारिरीक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य), प्रा. जी. के. थोरात (अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ, पुणे) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धायरी येथे ८ डिसेंबरला राबविल्या होत्या. वक्तृत्व स्पर्धेचा विषय मानवी हक्क संरक्षण व संवर्धन हा होता. या वक्तृत्व स्पर्धेत यशवंत खाडे (प्रथम क्रमांक), पराग बधिरके (द्वितीय क्रमांक), आरुषी पटीयाल (तृतीय क्रमांक) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

संस्थेच्या वतीने शिक्षण हक्क कायद्याची जनजागृती करीत असताना यात शिक्षकांचीही महत्वपूर्ण भूमिका राहिल्याने विद्यार्थी घडविणाऱ्या गुणवंत शिक्षकांचाही शिक्षक लोकशाही आघाडी संघटनेच्या वतीने सुचविण्यात आलेल्या शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: