इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसाहित्य

नायगाव येथे श्री दत्त पौर्णिमा उत्सहात संपन्न

Spread the love

चंद्रकांत चौंडकर,(महाराष्ट्र विश्व न्यूज,पुणे) – पुरंदरच्या तालुक्याच्या पुर्व भागातील श्री क्षेत्र नायगाव येथे श्री दत्तपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांचा दर्शनाचा लाभ घेतला.श्री दत्त पौर्णिमेनिमित्त पहाटे पांडेश्वर येथून ग्रामस्थांनी आणलेल्या कऱ्हेच्या पाण्याने श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना स्नान घालण्यात आले व अभिषेक करण्यात आला.

 

त्यानंतर ह.भ.प.भरत महाराज जोगी (परळी,बीड)यांच्या सुश्राव्य किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला.आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना त्यांनी मंञमुग्ध केले.त्यांना मृदुंग साथ तेजस खेसे, यशवंत भोसले यांनी दिली.गायक हभप दत्तात्रय बोरकर,चांगण महाराज,भोसले महाराज यांनी दिली.भजन साथ नायगाव ग्रामस्थ भजनी मंडळाने दिली.

 

श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापुजा पुजारी मनोज जगताप यांनी केली.त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसाद झाला.दत्त जयंती निमित्त पाळण्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.१२ वाजता भाविकांनी फुलांचा वर्षाव करून दत्तजन्म सोहळा साजरा केला.दत्त जयंतीनिमित्त दत्ताचा पाळणा,आरती झाली.अशी माहिती हभप रामकाका कड व हभप संतोष गायकवाड यांनी दिली.

 

अन्नदान गुलाब कड,रोहिदास कड,शिवाजी कड,रामदास कड,सुदाम कड,रविंद्र कड,सुभाष खेसे ,बाळासो खेसे,अशोक खेसे,शिवाजी कुंजीर,वसंत जगताप, रघुनाथ खळदकर,राजू दळवी,गोकुळ होले(नायगाव),सदाशिव होले, सुरेश होले,रघुनाथ होले(हडपसर),सखाराम भिसे,परशुराम भिसे ,काशीनाथ कोळेकर,तुकाराम कोळेकर,बाबुराव कोळेकर,नवनाथ कोळेकर(थेऊर),जयसिंग लवांड (हिंगणीगाडा) ,आप्पासो बोत्रे (यवत),विलास गायकवाड(पारगाव),अनिता वरपे (पुणे),निवृत्ती जगताप (राजेवाडी) यांच्या वतीने करण्यात आल्याचे बाळासाहेब कड यांनी सांगितले.मंदिर परिसराची स्वच्छता,लाईट,पाणी,दर्शनबारी आदिंची उत्तम व्यवस्था केली होती असे राहुल कड यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: