इतरबीडमराठवाडाराज्यसंपादकीय

कोण आहेत हे सिंघम अधिकारी? यांच्यावर कारवाई होणार का ?

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(बीड) – पोलीस विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सोशल मीडीयात शस्ञ घेतलेले फोटो शेअर न करण्याचा आदेश आहे. मात्र काही पोलीस अधिकारी याला जूमानत नसल्याच चित्र आपल्याला सोशल मीडीयावर पाहायला मिळत आहे.

शस्त्र घेऊन सोशल मीडीयात हिरोगीरी करणे, किंवा शस्त्र हातात घेतलेले फोटो व्हायरल करणे, प्रोफाइल पिक्चर ठेवणं, हे काही पोलीस अधिकाऱ्यांना चांगलंच महागात पडलं होतं.

राज्याचे पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांनी तसा आदेश काढून पोलीस विभागातील अधिकारी ते पोलीस कर्मचाऱ्यांना हातात शस्त्र घेतलेले फोटो टाकण्यासंबंधी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र तो आदेश अधिकारी पाळत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.

हर्ष पोद्दार हे बीडचे सध्याचे पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या फेसबूक प्रोफाईलवरती हातात एके 47 गन घेतलेला साध्या वेशातला फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येतोय. हा फोटो त्यांनी फेसबुकचा प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला आहे.

एखाद्या व्यक्तीने हातात शस्त्र घेऊन फोटो अथवा व्हीडीओ शेअर केला तर त्यांच्यावर कारवाई होते. मात्र पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना सूचना अथवा आदेश असतानासुद्धा ते जूमानत नसल्याचं स्पष्ट होतं.

पोलीस विभागात उच्च पदस्थ अधिकारी अशा प्रकारचं शस्त्रप्रदर्शन करत असतील तर मग ते कोणत्या कारणासाठी करत आहेत ? हा प्रश्न इथं उपस्थित होतो.

हर्ष पोद्दार यांनी तर परदेशात कायद्याची उच्च पदवीही घेतली आहे. त्यांच्या कार्यामूळे त्यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार ही प्राप्त झाला आहे.

कायद्याचे शिक्षण घेतले असतानासुद्धा अथवा पोलीस अधिक्षक म्हणून अशा प्रकारचे फोटो टाकणं योग्य आहे का ?

हर्ष पोद्दारांना पदाची दहशत दाखवायची का ? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात.

जनतेच्या मनातील पोलीस विभागाची बिघडत चाललेली प्रतिमा , त्यातच उच्च दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी असे फोटो शेअर करून नियम धाब्यावर बसवून पदाचा गैरवापर करणं हे मात्र पोलीस विभागासाठी चिंताजनक आहे.

त्यामूळे सोशल मीडियात अशा प्रकारचे फोटो शेअर करणाऱ्या कर्मचारी ते अधिकारी यांच्यावरती आता पोलीस विभाग काय कारवाई करतं ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: