इतरपश्चिम महाराष्ट्रराज्यसंपादकीयसोलापूर

वाखरीत डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन

Spread the love

एस एम पोरे,(महाराष्ट्र विश्व न्यूज,वाखरी ता.पंढरपूर) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय वाखरी येथे सरपंच सौ मथुराताई मदने ,जिल्हा परिषद सदस्य श्री निखिलगिर गोसावी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
निष्णात कायदेपंडीत, जगातील आदर्श लोकशाही पद्धत देशाला देणारे , स्वातंत्र्य मिळाल्यावरचे प्रथम कायदेमंञी म्हणून देशाचे काम पाहिलेल्या या ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी विस्तार अधिकारी पंचायत ए. व्ही. नलवडे , ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र जाधव, उपसरपंच सिताराम सुरवसे , जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मस्के ,तानाजी लोखंडे ,सुरेश लोखंडे ,शिवाजी मदने , नवनाथ मदने, हरिदास शिंदे ,ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपसचिव दत्तात्रय कारंडे , धर्मा मेटकरी नाना पोरे , विश्वास कोळी , विठ्ठल लोखंडे , दादा लोखंडे ,धनाजी पाटोळे , बबन लोखंडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: