इतरपश्चिम महाराष्ट्रराज्यसंपादकीयसोलापूर

हैद्राबाद घटनेविरोधात आष्टीत आक्रोश सभा

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(आष्टी ता.मोहोळ-सोलापूर) – हैद्राबाद येथे तरुण डॉक्टर मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात ग्रामपंचायत आष्टी आणि जनपरिवर्तन सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आक्रोष सभा घेण्यात आली.

आपल्या देशाची खूप मोठी जुनी संस्कृती आहे . डॉ. असणाऱ्या तरुणीबद्दल घडलेली घटना ही संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. विचारांची दृष्टी बदलण्याची खरी गरज आहे . खरं तर आपण म्हणतोय स्त्री सबलीकरनाची गरज आहे, पण खरं तर भारत देशात हळू हळू पुरुष सबलीकरनाची गरज भासु लागली आहे, असं जाणवायला लागलंय.

आताच झालेल्या संविधान दिनाच्या विचारांची ऊब आणखी मनात असतानाच ही घडलेली घटना म्हणजे खुप मोठे दुर्देव मानावे लागेल.आज खरचं महिलांकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची गरज आहे. असं मत मान्यवरांनी व्यक्त केले.

याप्रसंगी आष्टी येथे आक्रोश सभेत अत्याचारीत तरुणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थासह जनपरिवर्तन संस्थेचे अनेक सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: