विज्ञान तंत्रज्ञान

सोशल मिडिया आणि अश्लीलता

Spread the love

एस एम पोरे – आजकाल सोशल मिडीयात फेसबुकवर फेक अकाऊंटचं पीक जोमात आलयं. त्यावरुन अश्लील व्हिडीयो, पोस्ट , कमेंट केल्या जातात तशाच प्रकारे ओरिजनल अकाऊंटवरुन अश्लील पोस्ट आणि व्हिडीयोज टाकणारे कमी नाहीत . द्विअर्थी लिहणारे सुद्धा कमी-अधिक प्रमाणात दिसुन येतात .

कधीकधी मलाही अशा प्रकारची भाषा वापरण्याचा मोह आवरता येत नाही पण स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकारात काही महिलांचाही समावेश दिसतोय. यामध्ये आई-वडीलांचा ऊद्धार होऊन संस्काराच्या गोष्टींची चर्चा केली जाते.

हा सगळा अश्लील प्रकार करत असताना आपल्याला कोणीतरी पाहत असते, वाचत असते त्यावरुन आपल्याबद्दलचं वैयक्तिक मत ठरवलं जातं याचं भान आपण ठेवायला पाहिजे.
सोशल मिडियातील 90 % लोकं जशी दिसतात तशी नसतात .

10 % लोकांच्यात लिहण्याचा आणि अनुकरणाचा संगम पहायला मिळतो. चांगलं लिहणारा-लिहणारी प्रत्यक्ष आयुष्यात कसे असतील हे अनुभवल्याशिवाय समजत नाही . मी लिहलेलं काही लोकांना आवडतं किंवा नाही याचा अर्थ मी माणुस म्हणून चांगला असेल/नसेल असं नाही , त्यासाठी अनुभव हाच एकमेव पर्याय असु शकतो.

दुसऱ्याच्या सांगण्यावरुन तुम्ही एखाद्या माणसाबद्दलचं मत व्यक्त करु शकत नाही . म्हणून वरील मत हे माझ्या वैयक्तिक अनुभवावरुन मांडण्याचा प्रयत्न करतोय. खुप वेळा मी माझीही काही वैयक्तिक मते व्यक्त करतो. भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे ,त्याचा वापर करत असतो.

काही वेळा वेगवेगळ्या लेखातुन इतर माहितीच्या आधारे लिहण्याचा प्रयत्न केला जातो. मी मांडलेली भुमिका प्रत्येकाला आवडेलच असं नसतं , माझी वेगवेगळ्या गोष्टीविषयीची भुमिका सर्वांना आवडावी असाही माझा हट्ट नसतो.

प्रत्येक गोष्टीला दोन बाजु असतात, त्यास कोणी कसं सकारात्मक किंवा नकारात्मक पहायचा हा ज्याचा त्याचा विषय असतो. माझ्या लिखाणावरचा फिडबॕक मला सोशल मिडियावर मिळत नसला तरीसुद्धा प्रत्यक्ष भेटीतुन आणि फोनवरील चर्चामधुन मिळतो, आणि तोच फिडबक मला आणखी लिहण्यासाठी प्रेरणा देत असतो.

व्हाटसअप सारख्या सोशल मिडियावर रोज कितीतरी अश्लील पहायला मिळतं , यामध्ये मेसेजस, वेगवेगळ्या प्रकारचे अश्लील विनोद, व्हिडीयो, जातीयवादी लेखन या गोष्टी सर्रास न विचार करता पुढे पाठवल्या जातात.

अर्थात तोडीस तोड चांगले वाचायलाही मिळते पण तेच तेच परत आले कि जगात सुधारण्यासाठी आपणच शिल्लक राहिलोय असं वाटतं. सगळं जग राजा हरिश्चंद्र , राम- लक्ष्मणाच्या पंक्तीत जावुन बसल्याचा भास होतो.

शेवटी एकच तुमच्या प्रत्येक सामाजिक , राजकीय कृतीचं समाज मुल्यांकन करत असतो. समाज आहे म्हणून आपल्या असण्याला अर्थ आहे व आपण आहे म्हणूनच समाज आहे, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे . एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण त्याचा विचार केलाच पाहिजे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे पण विशिष्ट चौकटीत राहुन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: