इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेमनोरंजनराज्य

पुण्यात रंगली ‘पानिपत’ची पत्रकार परिषद; सिनेमा प्रदर्शित होणार ६ डिसेंबरला

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – येत्या महिन्यात म्हणजेच ६ डिसेंबर रोजी पानिपतच्या तिस-या युध्दाचा थरार आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे. इसवी सन १७६१ मध्ये झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासातलं सर्वांत महत्त्वाचं युद्ध मानलं जातं.

‘हर हर महादेव’चा जयघोष करीत हत्ती, घोडे, तोफांनी सज्ज असलेल्या मराठा फौजा आणि समोर अनुभवी आणि कुशल सेनानी अहमद शहा अब्दाली आणि त्याची फौज…. मराठ्यांचा इतिहास भव्य – दिव्य रूपात पडद्यावर मांडणाऱ्या ‘पानिपत’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् सर्वत्र या सिनेमाविषयी चर्चा, त्याचे कौतुक झाले आणि सिनेमाविषयी असलेली उत्सुकता अनेकांनी दर्शवली.

‘मराठा… भारत भूमीचे असे शूर योद्धा ज्यांचा धर्म आणि कर्म केवळ शौर्य आहे.’ असं म्हणत सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात होते आणि आपण प्रत्येक दृश्यागणिक जणू पानिपतच्या रणभूमीत हजर झालो आहोत असा आभास निर्माण केला जातो. ट्रेलरनंतर या सिनेमातील कलाकार, गाणी एक-एक करुन प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि त्यांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली.

ज्या युध्दाची गोष्ट वाचनाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहचली ते युध्द आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहेत. या सिनेमाच्या प्रसिध्दीच्या निमित्ताने पुणे शहरात ‘पानिपत’च्या कलाकारांसोबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

पत्रकार परिषदेत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, कलाकार अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन, गश्मीर महाजनी, पद्मिनी कोल्हापुरे, मोहनिश बहल, अजय-अतुल उपस्थित होते. यावेळी पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक येथील पत्रकार उपस्थित होते आणि प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून सिनेमाविषयीची चर्चा, शूट दरम्यानचे काही किस्से उलगडत गेले आणि कलाकार आणि पत्रकार यांच्यामधील संवाद रंगत गेला.

मराठा सैन्य शौर्यानं लढलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली लढलं त्या सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अभिनेता अर्जुन कपूर दिसणार आहे तर अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीची भूमिका संजय दत्त यांनी साकारली आहे. तसेच, सौंदर्य आणि शौर्य यांचा मिलाफ असलेल्या पार्वती बाईंच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनॉन दिसणार आहे.

‘मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’, असं ज्या युद्धाचं वर्णन केलं जातं त्या ‘पानिपत’च्या तिसऱ्या युद्धाचा थरार ६ डिसेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की पाहा.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: