इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

दिव्यांग दिन ३ डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आणि माहिती अधिकारांचे उल्लघनासंदर्भात दिव्यांग दिनी ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दिव्यांग आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे .मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांना त्यांनी यासंबंधी निवेदन पाठवले आहे .

दिव्यांगांच्या प्रलंबित समस्या सोडवाव्यात तसेच माहिती अर्जांचे संकलन माहिती अधिकाराखाली करण्याच्या प्रयत्नात असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यास माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दिव्यांग कल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे .

प्रकाश निकम, डॉ. संजय जोशी, अरूण औचरे, अतुल जोशी, विलास निकम, बबन निकम,शैलेश हेंद्रे,मंगेश निकम , विशाल सुर्वे, पूनम हेंद्रे, स्वप्नील जोशी यांनी हे निवेदन दिले. या निवेदनाच्या प्रति त्यांनी कार्यकारी अधिकारी ,समाज कल्याण दिव्यांग विभाग ,पुणे ,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता , समाज कल्याण दिव्यांग विभाग ,पुणे यांना पाठविल्या आहेत .

अर्जांची माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी दिव्यांग दिन ३ डिसेंबर २०१९ रोजी आंदोलन करण्याचा इशारा निलेश प्रकाश निकम यांनी पत्रकाद्वारे केला आहे . याबाबतचे निवेदन त्यांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी दिव्यांग कार्यालयात दिले आहे .

निलेश निकम हे ४ ऑकटोबर २०१८ पासून निलेश निकम हे दिव्यांग समस्या ,प्रलंबित प्रश्न ,अर्ज यांची चौकशी करणारे किती अर्ज माहिती अधिकाराखाली आले याची माहिती संकलित करण्याच्या हेतूने माहिती अधिकाराखालीच पाठपुरावा करीत होते .

शासनाच्या कोषागारात त्यान्वये भरणा झाला कि नाही या विषयाची माहिती रीतसर मागत होते . मात्र ,माहिती न मिळाल्याने आणि उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी अपील केले . त्यांनतर अर्धवट स्वरूपाची माहिती देण्यात आली .अनेक माहिती अर्जांचे चलनाचे पैसे न भरता माहिती दिल्याने शासनाचे कोषागाराचे किती चलन बुडाले ही माहिती दडवली जात आहे .

ही शासकीय सेवेत झालेली कुचराई असून त्याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी ,दिव्यांग कल्याण कार्यलयातील जनहित माहिती अधिकाऱ्यांकडून , अर्जदारांकडून बुडीत महसुलाची वसुली करावी ,अशी मागणी निलेश प्रकाश निकम यांनी पत्रकाद्वारे केली आहे .

ही मागवलेली माहिती २ डिसेंबर पर्यंत माहिती अधिकारात दिली नाही ,सेवेत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर दिव्यांग दिन ३ डिसेंबर २०१९ रोजी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: