इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

हैद्राबाद घटनेविरोधात पुणे येथे आंदोलन आणि निदर्शने

Spread the love

एस एम पोरे,(महाराष्ट्र विश्व न्यूज,पुणे) – हैद्राबाद येथे तरुण मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व बलात्कार करुन हत्या केल्याच्या विरोधात NSUI विद्यार्थी , जागरुक पुणेकर समिती,जनता दल सेक्युलर ,स्वाभिमानी विद्यार्थी परिषद,हेल्पिंग हँड , नोईंग गांधीझम , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवक क्रांती दल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड आणि समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज शनिवार , दि. 30 नोव्हेंबर रोजी संभाजी चौक (गुडलक चौक) येथे आंदोलन व घोषणाबाजी करत निदर्शने केली.

दोन दिवसापुर्वी हैद्राबाद येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रियंका रेड्डी नावाच्या तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तिचा अमानुष छळ केला , नंतर तिला मारुन टाकण्यात आले.

आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी भावना सर्व तरुणाईत असुन कडक कारवाई न झाल्यास देशातील तरुणाई न्याय मागण्यासाठी रस्त्यावर ऊतरणार असल्याची माहिती NSUI च्या मोहिनी जाधव यांनी दिली.

यावेळी युवक काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस स्नेहल डोके-पाटील , सतिश गोरे, युवक काँग्रेसचे जयंतकुमार सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दयानंद शिंदे, सचिन पाडुळे, सतीश पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी हर्षलकुमार कुलकर्णी, सौरभदादा राऊत, जवाहर सोनवणे , संतोष शिंदे, युवक क्रांती दलाचे आप्पा अनारसे, सुदर्शन चकले यांच्यासह नागरिक आणि युवक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: