इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

१६ कप्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच डोळ्यासमोर हेतू -सदानंद शेट्टी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. १६ क कसबा – सोमवार पेठ या ठिकाणी पुणे महानगरपालिका सन २०१९ – २०२० मधील रक्कम रु २ कोटी ७० लाख प्रभागच्या सर्वांगीण विकासाचा भव्य भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला.

यावेळी सदानंद कृष्णा शेट्टी ( मा. स्थायी समिती अध्यक्ष ), सुजाता सदानंद शेट्टी ( कार्यक्षम नगरसेविका पुणे म. न.पा.) याच बरोबर डॉ. शं. म. तोडकर (मा . उपमहापौर ), मा. निलेशभाऊ अल्हाट (पश्चिम महा.युवक अध्यक्ष), मा. ज्योतीबा शिर्के (सामाजिक कार्यकर्ते ), बुवा नलावडे ( मा. नगरसेवक ) असे अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

यावेळी सदानंद शेट्टी बोलताना म्हणाले की प्रभाग क्र. १६ क कसबा – सोमवार पेठमध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला असून यात प्रामुख्याने आगामी काळात रस्ता डांबरीकरण, फूटपाथ करणे, बोलार्ड बसवणे, रेलिंग व बोलाई बसवणे, राडारोडा उचलणे, कॉक्रीट करणे, नामनिर्देशित फलक लावणे, सार्वजनिक शौचालय दरवाजे बदलणे अशी अनेक कामे पार पडणार आहेत.

प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच डोळ्यासमोर हेतू ठेवून या निधीचा कार्यक्षम नगरसेविका सुजाता शेट्टी उपयोग करणार आहेत. पुढे शेट्टी म्हणाले की तसे पाहिले तर हा विकासासाठी हा विकास निधी फार कमी आहे.

महानगरपालिकाने प्रत्येक नगरसेवकाला २ कोटी रुपये मिळाले दिले असून सुजाता शेट्टी यांना २ कोटी बरोबर ७० लाख रु जास्त निधी त्यांनी महानगरपालिका व पदाधिकाऱ्यांशी बोलून मिळवला आहे.

नगरसेविका सुजाता शेट्टी म्हणाल्या की “मी कार्यरत असलेल्या प्रभागात घरोघरी जावून आम्ही नागरिकांशी संवाद साधला व त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी व समस्या लक्षात घेवून त्या गोष्टींचा पाठपुरावा केला.

सदानंद शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सहकार्याने हे सगळे शक्य झाले असे त्या म्हणाल्या. पुणे महानगरपालिका व अधिकाऱ्यांनी दिलेल्या बजेट बद्दल सुजाता शेट्टी यांनी त्यांचे आभार मानले.

या भूमिपूजन सोहळ्याला सुधीर इंगळे, सिराज बागवान, रविभाऊ आरडे, मंगेश साखरे, रमेश शेट्टी, सदाशिव शेट्टी, सुखदेव शिंदे, ज्योती ताई कांबळे, गोविंद साठे, बबलू सय्यद, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धर्मेंद्र खेतरे यांनी केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: