इतरबुलढाणाराज्यविदर्भसंपादकीय

बायगाव बुद्रुक येथील शालेय शिक्षण समिती अध्यक्षपदी किरण खरात यांची निवड

Spread the love

गजानन कायंदे ,(महाराष्ट्र विश्व न्यूज,बायगाव बुद्रुक) – शासनाने सुरु केलेल्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी बायगाव बु येथील किरण खरात यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली.

पालक तसेच शाळेतील व्यवथापनावर एक सामंजस्य राहावं त्यासाठी शासनाने या समितीचे राज्यभरात गठन केले आहे. यावेळी मावळते अध्यक्ष देवानंद कायंदे यांनी किरण खरात यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

देवानंद कायंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात शाळेला रंगरंगोटीची कामे, गेट चे काम, वृक्षारोपण तसेच विविध कॊतुकास्पद कामे केली. व अशाच कामाची अपेक्षा त्यांनी नवचर्चित अध्यक्ष किरण खरात यांचेकडून केली आहे.

मुखाध्यापक अंबादास गवई, पडघान सर, शिक्षण समितीची सदस्य संजय वणवे, सुनील नागरे, दामोधर वाघ,रावडी शिंदे विष्णू नागरे, विजय राठोड तसेच पालक वर्ग यांनी नवचर्चित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: