इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

वनस्पती शास्त्र विभागप्रमुख पदी डाॅ. भोसले

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) –  येथील वाडीया महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी प्रा. डाॅ. के. एस्. भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. प्राचार्य डाॅ. वेंकटराघवन यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

वनस्पती शास्त्रात विद्यावाचस्पती असलेले डाॅ. भोसले 2006-2007 साली SET परिक्षा उत्तीर्ण होऊन वाडीया महाविद्यालयात रूजू झाले. त्या अगोदर त्यांनी काही कालावधी फर्ग्युसन महाविद्यालयातही अध्यापनाचे काम केले आहे.

वाडीया महाविद्यालयात रूजू झाल्यानंतर त्यांनी अध्यापनासोबतच संशोधनाचे कार्य ही जोमाने केले. आजमितीला त्यांचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले आहेत.

याचबरोबर त्यांनी पाच वर्षे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी ही जबाबदारी ही पार पाडली. त्यावेळी निवासी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी गावांचा घडवून आणलेला कायापालट चर्चेची बाब ठरली होती.

स्वतः सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचे शेतकरी पुत्र असलेले सर आले, मका, मेथी, भुईमूग अशा नगदी पिकांचे कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेतात व त्याबद्दल इतर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन ही करतात.

ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना डाॅ. भोसले म्हणजे एक तारणहार वाटतात.
शिक्षणासोबतच निसर्गप्रेमी असलेले डाॅ. भोसले हे इतिहासप्रेमी लेखक ही आहेत. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर लिहलेल्या नाटकामध्ये खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी भूमिका केली होती. दुर्गभ्रमंती ची आवड असल्याने आणि पश्चिम घाटातील वनस्पती संशोधनासाठी त्यांनी अनेक किल्ले सर केले आहेत.

अनेक शैक्षणिक पुस्तकांचे लेखक असलेले डाॅ. भोसले हे चालता बोलता वनस्पती शब्दकोश आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक साॅफ्टवेअर ही बनवले आहे की, ज्यामध्ये छायाचित्र किंवा नावावरुन वनस्पती ची पूर्ण शास्त्रीय माहिती मिळेल.

डाॅ. भोसले यांची विभागप्रमुख म्हणून निवड झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य मा. श्री. राजेश पांडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि विभागाच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

वाडीया महाविद्यालयातून इतर विभागप्रमुख, शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी संघटना यांनी ही त्यांचे अभिनंदन केले. तसेच हरितक्रांती बळीराज्य संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. आबा काळे यांनी अभिनंदन करताना ‘पुस्तकी शिक्षण आणि शेतकरी यांच्यातील एक दुवा म्हणून काम करताना स्वतः शेतकरी पुत्र असलेल्या डाॅ. भोसले यांचे अध्यापन व संशोधन शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरेल’ असा आशावाद व्यक्त केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: