इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

सकल ललित कलाघर यांच्या वतीने ‘नृत्यसंगम’ कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – सकल ललित कलाघर यांच्या वतीने ‘नृत्यसंगम’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार ५ डिसेंबर रोजी सायं ६.३० वाजता सकल ललित कलाघर, मुकुंदनगर येथे करण्यात आले असल्याची माहिती अरुंधती पटवर्धन यांनी दिली.

या कार्यक्रमात चार नृत्यशैलीची प्रस्तुती होणार असून यात मेघना राव व निखील परमार हे कंटेपररी, अरुंधती पटवर्धन भरतनाट्यम, राधिका गुमास्ते ओडिसी तर धनश्री पोतदार कथक यांचा समावेश करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे.

दिनांक : ५ डिसेंबर २०१९
वेळ : सायं ६.३० वाजता
स्थळ : सकल ललित कलाघर, मुकुंदनगर, पुणे

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: