इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

‘आसिफजाही ‘आणि ‘ तिहेरी तलाक’ या दोन पुस्तकांचा २ डिसेंबर रोजी प्रकाशन सोहळा

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – ‘आसिफजाही – खंड १’ आणि ‘ तिहेरी तलाक’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा २ डिसेंबर रोजी पुण्यात आयोजित केला आहे. शब्द पब्लिकेशन, मुस्लिम अकादमी आणि युवक क्रांती दल यांनी संयुक्तपणे हा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे.

दिनांक २ डिसेंबर २०१९ रोजी सांयकाळी साडेपाच वाजता,सोमवारी जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे.जांबुवंत मनोहर ( राज्य संघटक, युक्रांद ) यांनी ही माहिती दिली.

निजाम राजवटीचा इतिहास असलेले ‘आसिफ जाही “हे पुस्तक कलीम अझीम, सरफराज अहमद, सय्यद शहा वाएज यांनी लिहिले आहे.” तिहेरी तलाक” हे पुस्तक कलीम अझीम यांनी लिहिले आहे.” तिहेरी तलाक” या गुंतागुंतीच्या समस्येचा, द्वेषधारी व संधीसाधू राजकारणाचा आणि भारतीय मुसलमानांच्या मानसिकतेचा दस्ताऐवज ‘तिहेरी तलाक ‘पुस्तकात आहे.

डॉ. के. जी. पठाण (माजी अधिष्ठाता, भारती विद्यापीठ, पुणे),डॉ. राजा दीक्षित, ( माजी इतिहास विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे),डॉ.अब्दुल कादर मुकादम, मुंबई (विचारवंत ), येशू पाटील (शब्द पब्लिकेशन, मुंबई),नीलेश पाष्टे, (डायमंड पब्लिकेशन, पुणे) यांच्या हस्ते दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: