इतरमुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

गोव्यात राजकीय भूकंप होणार, संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई ) – महाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा गोव्याकडे वळविला असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. लवकर गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावादेखील संजय राऊत यांनी केला आहे.

गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. गोव्यात सध्या भाजपाचं सरकार असून प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदी आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: