इतरचंद्रपूरप्रशासनराज्यविदर्भसंपादकीय

आंबोली येथील नाट्य सभागृहालाच बनविले कृषी केंद्र

आंबोली ग्राम पंचायत चा प्रताप

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(शंकरपूर चंद्रपूर) – राष्टसंत तुकडोजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन असलेले, सामाजिक व धार्मिक वारसा लाभलेल्या आंबोली येथील सार्वजनिक व्यासपिठ व त्याला लागून असलेल्या खोल्या ग्रामपंचायत ने एका दुकानदाराला कृषीकेंद्रासाठी कीरायाने दिल्याने येथील नागरीकानीं संताप व्यक्त केला आहे.

आंबोली व जवळील चौरस्ता येथे वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज यांनी काही काळ घालवीला असून या परिसरात राष्टसंत तुकडोजी महाराज याचे हजारो अनुयायी आहेत. त्यांचे स्मुती निमीत्य दरवर्षी 28 डिसेंबर या दिवशी चौरस्ता येथिल स्मारका जवळ मोठी यात्रा भरते व काल्याच्या कार्यक्रम केला जातो.

या निमित्याने आंबोली येथे राष्टसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मारकाच्या मदतीसाठी नाटकांचे आयोजन केल्या जाते, त्याच प्रमाणे दिवाळी व इतर सना सुदीच्या निमीत्याने अनेक समाजिक नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम, डान्स स्पर्धा आदि कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केल्या जाते, परंतु येथील व्यासपीठ व स्पर्थकांना कपड़े बदलवीन्या करीता असलेल्या खोल्या अशा कार्यक्रमासाठी वापर न करता केवळ ग्रामपंचायतच्या उत्पन्न वाढी किंवा स्वतः च्या स्वार्थासाठी एका क्रूषी केन्द्र मालकास किरायाने दिला आहे.

शासनाचा लाखो रुपया चा निधी खर्च करून गावातील नागरिकांना व गावातील तरुण, तरुणिच्या कला गुणांना वाव मिळावा, अशा विविध कार्यकामासाठी नाट्य सभागृह बांधण्यात आले परंतु येथील ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच्याने स्वतः चे स्वार्थापोटी सरपंच पदाचा दूरउपयोग करून या सभागृहाची दैनिय अवस्था केली आहे असे गावक-या कडुन बोलल्या जात आहे.

दुकानदार सदर सभागृहात शेतीची औषधी किटकनाशके, सोबतच रासायनिक खत ठेवत असल्याने रासायनिक खताच्या ओलाव्याने भिंती खराब होत असल्याचे दिसून येत असल्याने येतील कृषीकेंद्र हटविण्याची मागणी गावकरी करीत आहे. आतातरी संबंधित अधिका-यानी याकडे लक्ष देऊन आमची समस्या सोडवावी असेही गावक-या कडून बोलल्या जात आहे.

या बाबत विद्यमान सरपंच श्री ठाकरे यांना विचारणा केली असता त्या व्यासपीठाचा व बाजूला असलेल्या खोल्याचा सांस्कॄतिक कार्यक्रमाकरीता वापर होत नसल्यामुळे, ग्राम पंचायत चे उत्पन्न वाढावे या उद्देशाने तत्कालीन सरपंच भशारकर यांनी दूकानदारास किरायाने दिले आहे असे सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: