इतरकृषीबुलढाणाराज्यविदर्भसंपादकीय

देऊळगांवराजा तालुका दुष्काळ व नुकसानग्रस्त निधीच्या प्रतीक्षेत

शिवसंग्रामची निधी वाटप करण्याची मागणी

Spread the love

गजानन कायंदे,(महाराष्ट्र विश्व न्यूज,देऊळगांवराजा -बुलढाणा) – देऊळगांवराजा तालुक्यात शासनाने मंडळ निहाय दुष्काळ जाहीर करून देखील अद्यापही येथील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त निधीचा लाभ मिळाला नाही. तालुक्यातील शेतकरी दुष्काळग्रस्त निधीच्या प्रतीक्षेत असतांना परतीच्या पावसाने शेत मालाचे प्रचंड नुकसान केले .

आज शासनाने फक्त सर्व्हे केला मात्र अद्यापही मदत मिळालेली नाही. येथील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त व पावसाने नुकसान झालेल्या निधीचे तत्काळ वाटप करण्यात यावे,अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.अशी मागणी आज ता.२५ रोजी एका निवेदनाद्वारे शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवेदनात नमूद आहे की,शासनाने महाराष्ट्रात काही भागात दुष्काळ जाहीर केला. त्या अनुषंगाने देऊळगांव राजा तालुक्यातील मेहुणाराजा,तुळजापूर, देऊळगांव मही,अंढेरा आणि देऊळगांव राजा ही महसूल मंडळे दुष्काळग्रस्त जाहीर केली आहे.जवळपास पूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालेला आहे.मात्र अद्यापही येथील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त निधीचे वाटप झालेले नाही.

शेतकरी,शेतमजूर,विध्यार्थी अजून देखील दुष्काळग्रस्त निधीच्या प्रतीक्षेत आहे.विध्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा दुष्काळ ग्रस्त असल्याचा लाभ मिळालेला नाही.तालुक्यात परतीचा पाऊस सतत जोरदार बरसल्याने सोयाबीन,कपाशी,मक्का या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिके गमावण्याची वेळ येथील शेतकऱ्यावर अली आहे.

शासनाने पंचनामे केले मात्र प्रत्येक्षात शेतकऱ्यांना कोणतेही मदत मिळालेली नाही.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा,मुलींचे लग्न कसे करायचे असे भीषण प्रश्न शेतकाऱ्यांपुढे उभे राहिले आहे.त्यात पीक विम्याचे पैसे देखील अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

शासनाने येथील भागाच्या सर्व्हे करून दुष्काळ जाहीर केला तरी देखील शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.शासनाने एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा होऊन अपेक्षा भंग झाली आहे.शासनाने येथील शेतकऱ्यांबाबत गांभीर्याने विचार करून तत्काळ दुष्काळग्रस्त व परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान ग्रस्त निधीचे वाटप करावे.

अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.निवेदनावर शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,उपाध्यक्ष अजमत पठाण,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे,उपाध्यक्ष विनोद खार्डे,विनायक अनपट,विनोद पाबळे,अनिस खान आदीच्या स्वाक्षऱ्या आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: