इतरमुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

अजित पवारांची भाजपसोबत जाण्यामागची 10 कारणं

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून हाय व्होल्टेज ड्रामा सुरु असतानाच शनिवारी (23 नोव्हेंबर) राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. कोणालाही कल्पना नसताना सकाळी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे गुपचूप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

तर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि शरद पवारांशी बंडखोरी केली आहे. काँग्रेस- शिवसेना नेतृत्वावर नाराज असल्याने अजित पवारांनी शरद पवारांशी बंडखोरी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजित पवार भाजपसोबत जाण्याची 10 कारणे कोणती?

शिवसेनेकडे ताकदीचं नेतृत्व नाही, मुख्यमंत्रिपदासाठी दमदार उमेदवार नाही

काँग्रेसचा संपूर्ण कारभार दिल्लीतून चालतो, राज्य नेतृत्वाला अधिकार नाहीत

राज्यात काँग्रेसची अवस्था बिकट, ग्रामपंचायतीतसुद्धा निवडूण येणं कठीण

शिवसेनेचा कारभार मातोश्रीवरुन, राज्य चालवण्याचा कुणालाच अनुभव नाही

काँग्रेस शिवसेनेसोबत जाऊन राज्याला स्थिर सरकार देता येणार नाही

पक्षवाढीसाठीही स्थिर सरकारमध्ये राहणं उत्तम, फाटाफुटीची भीती नाही

भाजपा मजबूत पक्ष, राज्याच्या प्रगतीसाठी भाजपसोबत जाणं शहाणपणाचं

केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्याच्या विकासासाठी कामी येईल

शेतकरी, मजूर, कामगारांचे प्रश्न तडीला लावण्यासाठी मदत होऊ शकते

बदलत्या राजकीय स्थितीत काँग्रेस-सेनेसोबत जाणं आत्मघातकी ठरु शकतं

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: