इतरमुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

लवकरच शिवसेनेत मोठा भूकंप होणार : आमदार राणा

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – आगामी काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार आहे तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील आमच्या बरोबर येणार असल्याचा दावा, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केला आहे.

भाजपा समर्थक असेलेले रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील आमदार आहेत. शिवाय विधानसभेवर ते तिसऱ्यांदा निवडून गेलेले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करतील, असं भाकीत केलं होतं.

सध्या राज्यात सुरू असलेल्या वेगवाग घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना आमदार राणा यांनी सांगितले की, मी उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले आहे. थोडा वेळ लागला परंतु राज्याला आता चांगले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळालेले आहेत.आगामी काळात शिवसेनेत मोठा भूकंप, मोठी उलटपुलट होणार आहे वराष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील आमच्या बरोबर येणार आहेत.

याचबरोबर भाजपा सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या १७५ पेक्षाही जास्त होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. आम्ही यादी तयार केलेली असून त्यातून हा आकडा आला आहे. शिवसेनेत सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे हे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: