इतरमुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाल्यानंतर आज सोमवारी सकाळी अकरा वाजता आपल्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला तत्पूर्वी विधानभवनात जाऊन त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानभवनात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन केले तेव्हा त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हेही उपस्थित होते.

त्यानंतर तेथून ते थेट मंत्रालयात आले, बरोबर 11 वाजता त्यांनी आपल्या दालनात प्रवेश केला. आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी एका महिलेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा ही दिला. माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी त्यांच्या दालनात जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदनही केले.

मात्र यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार हे उपस्थित नव्हते. अजित पवार हे आपला पदभार स्वीकारण्यासाठी नंतर येणार आहेत, असे यावेळी बोलले जात होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही मिनिटेच आपल्या दालनात हजेरी लावल्यानंतर बाहेर पडून थेट वर्षा निवास्थान गाठले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: