इतरमुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

शिवसेना, राष्ट्रवादी- काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा; १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राजभवनवर सादर

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – एकीकडे महाराष्ट्रातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असतानाच आज दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राजभवनवर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. याबाबतचे पत्र तिन्ही पक्षांनी राजभवनात सादर केले.

या पत्रासह शिवसेना विधीमंडळ नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह तिन्ही पक्षांच्या आमदारांच्या सह्यांची यादी जोडली आहे. याबाबतची माहिती जयंत यांनी दिली. १६२ आमदारांच्या सह्या असणारे पत्र आम्ही राज्यपालांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला तत्काळ सरकार स्थापन करण्यास पाचारण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: