इतरमुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

सत्तास्थापनेबाबत आता कोणत्याही क्षणी घोषणा!

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला महाराष्ट्रातील सत्तापेच आज सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यावर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीमध्ये मतैक्य झाले आहे. आता कोणत्याही क्षणी नव्या सरकारच्या स्थापनेबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून गेली काही दिवस दिल्लीत राजकीय चर्चा झाल्या. आता सत्तास्थापनेच्या चर्चांचे केंद्र दिल्लीवरुन मुंबईत आले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज घटक पक्षांसोबत आमदार धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. तर आजच विधिमंडळ पक्षाचा नेता ठरविण्यासाठी काँग्रेस आमदारांची बैठक मुंबईत होणार आहे.

आघाडीतील घटकपक्षांच्या बैठकीनंतर काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत एकमत झाल्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकत्रितपणे सत्ता स्थापनेबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: