इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

समर्पित जीवन गौरव पुरस्कार प्रदान समारंभ

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) –  विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र आळंदी येथे उडुपी, कर्नाटक येथील पेजावर मठाचे अधोक्षज ज्ञानमठाधिपती ज्ञानब्रह्मर्षि परमपूज्य श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामीजी महाराज आणि जळगांव येथील संत श्री सखाराम महाराज संस्थान, अंमळनेरचे ११वे विद्यमान सत्पुरूष गुरूवर्य ह.भ.प.श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर यांना समर्पित जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जागतिक सहिष्णुता सप्ताह आणि तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर महराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून कार्तिकी एकादशीच्या दिवशी, शनिवार दि.२३ नोव्हेंबर २०१९ रोजी सायं. ६.०० वा. हा पुरस्कार प्रदान समारंभ लाखों वारकर्‍यांच्या उपस्थितीत होणार आहे.

हा पुरस्कार जगप्रसिद्ध संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

कृपया वरील कार्यक्रमांच्या वार्तांकनांसाठी आपल्या दैनिकाचा/वाहिनीचा प्रतिनिधी पाठवावा व या व्याख्यानमालेस यथोचित प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: