इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

पुण्यात स्मार्ट सिटीचा E टॉयलेट झाला भिकाऱ्यांचा अड्डा

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – असंच दुर्लक्ष होत राहिले तर जी E शौचालये चांगल्या अवस्थेत आहेत त्यांचीही वाट लागेल अशी भीती पुणेकरांनी व्यक्त केलीय.

लाखो रुपये खर्च करून स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सहा आठ महिन्यांपूर्वी अत्याधुनिक E टॉयलेट उभारण्यात आले होते. त्यातल्या अनेक टॉयलेट्सची दुरावस्था झालीय. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना येथील संभाजी पार्क लकडी पूल येथील परिसरात अत्याधुनिक टॉयलेट महिलांसाठी सुरू केली होती मात्र योग्य देखभाल नसल्याने त्याची अवस्था वाईट झालीय.

1 रुपयाचे नाणे टाकून दरवाजा उघडला जायचा आणि अत्यंत स्वच्छ असणारी शौचालये महिलांसाठी आवश्यक आणि उपयुक्त ठरली होती. मात्र पहिल्या टप्प्यात बसवण्यात आलेल्या या E टॉयलेट्स मधील लकडी पूल येथील मोक्याच्या जागेवरील E टॉयलेटची दुरवस्था झालीय.

या टॉयलेटमध्ये 1 रुपयाचं कॉइन टाकून दरवाजा उघडला जात असे. ती पैसा जमा व्हायची यंत्रणा चोरीस गेलीय. त्यामुळं सध्या दरवाजा सताड उघडा असतो. तसेच या टॉयलेटमधील साहित्यही एकतर चोरीला किंवा मोडकळीस आलंय. रात्री तर हे शौचालय आणि परिसर हा भिकाऱ्यांचा अड्डा बनला आहे.

काही समाजकंटाकांनी E टॉयलेटची दुरवस्था केली असली तरी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकारी पुणे पालिका प्रशासन यांची यंत्रणा, ज्यांनी निगा राखली पाहिजे, देखभाल केली पाहिजे त्या यंत्रणा गाफील आहेत. असंच दुर्लक्ष होत राहिले तर जी E शौचालये चांगल्या अवस्थेत आहेत त्यांचीही वाट लागेल अशी भीती पुणेकरांनी व्यक्त केलीय.

विशेषत: महिलांसाठी आवश्यक आणि उपयुक्त असणारी E टॉयलेट ही जास्तीत जास्त संख्येने उभारली पाहिजेत आणि जी उभारली आहेत त्यांची सुरक्षा, देखभाल,निगा ही योग्य पद्धतीनं राखली गेली पाहिजे अशी मागणी होतेय.अन्यथा लाखो रुपये पाण्यात जातील अशी शंकाही व्यक्त केली जातेय.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: