इतरमुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

राज्यातली सत्ता गेल्यानंतर भाजपला बसणार आणखी एक मोठा धक्का

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – महाराष्ट्रात सत्तेचं नवीन समिकरण जुळल्याने आता काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आलीय. त्यामुळे भाजपला या पुढे धक्के बसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातल्या सत्तेचा हाता तोंडाशी आलेला घास गेल्यानंतर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला स्वबळावरच सत्ता मिळणार अस जबर आत्मविश्वास होता. मात्र निकालानंतर भाजप-शिवसेनेला बहुमत मिळालं मात्र भाजप 105 जागापर्यंतच थांबल्याने शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा केला. भाजपने अडीच वर्षांची अट मान्य केली नाही त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात आता सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसलाय. आता विधान परिषदेतही भाजपला हादरा बसणार आहे.पुढच्या वर्षी विधान परिषदेच्या 26 जागा रिकाम्या होत आहेत. महाराष्ट्रात सत्तेचं नवीन समिकरण जुळल्याने आता काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आलीय. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत धक्का बसू शकतो. यातल्या बहुतांश जागा याच तीन पक्षांना मिळण्याची शक्यता असून तिथेही भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.सोमवारी सत्तास्थापनेचा दावा?

गेल्या महिनाभरापासून निर्माण झालेली सत्तास्थापनेची कोंडी फुटण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. शुक्रवारी (22 नोव्हेंबर) मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संयुक्त बैठक होणार असून त्यात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आज दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते पृथ्विराज चव्हाण यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सर्वच मुद्यांवर एकमत झालं असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता सगळं लक्ष शिवसेनेवर केंद्रीत होणार आहे. पुढची रणनीती काय असावी यावरही शिवसेनेसोबत चर्चा होणार असून सत्तास्थापनेचा दावा आणि शपथविधीची तारीखही ठरवली जाणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: