इतरक्रीडादेशसंपादकीय

विंडीजविरुद्ध विराट कर्णधार; शमी, भुवनेश्वरचे पुनरागमन

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० आणि वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची करण्यात आली असून या दोन्ही मालिकांमध्ये विराट कोहली भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देत संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती.

विंडीजविरुद्ध मालिकेत विराट पुन्हा भारतीय संघाचं नेतृत्व करणार असून रोहित शर्माकडे उपकर्णधारपद असणार आहे. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा टी-२० आणि वन-डे संघात स्थान मिळवले आहे. दोन्ही संघांत फार बदल करण्यात आलेले नाहीत. केदार जाधवचा वन-डे टीममध्ये समावेश करण्यात आला आहे तर फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरलाही वनडेत संधी देण्यात आली आहे.

रोहित शर्माला विंडीजविरुद्ध मालिकेतून विश्रांती देण्यात येईल, असे सांगितले जात होते. न्यूझीलंड दौऱ्याआधी रोहितवरील ताण थोडा हलका करण्यासाठी संघ व्यवस्थापन हा निर्णय घेईल, असा तर्क लावला जात होता. मात्र तसं न करता विंडीजविरुद्ध मालिकेला तितकंच महत्त्व देत रोहितला संघात कायम ठेवण्यात आलं आहे. भारतीय संघ जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जात असून त्याआधीची ही मालिका महत्त्वाची असणार आहे.

विडींजविरुद्ध टी-२० मालिकेतील पहिला सामना ६ डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे दुसरा टी-२० सामना तर ११ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे तिसरा टी-२० सामना होणार आहे. वनडे मालिका १५ डिसेंबरला सुरू होईल. पहिला वनडे सामना चेन्नईत, दुसरा सामना १८ डिसेंबरला विशाखापट्टणम् तर तिसरा वनडे सामना २२ डिसेंबर रोजी कटक येथे होईल.

टी-२० संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार. वनडे संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: